स्वगत…

सातत्य ही सगळ्यांना साधणारी गोष्ट नाहीए. त्यामुळंच सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांचं कर्तृत्व वेगळं भासतं. त्यांच्याविषयी हेवा वाटतो. मी अनेकदा यावर विचार केला, मित्रांमध्ये अनेकदा बोलणं होतं. मात्र एखाद्या गोष्टीत सातत्य राखणं मला कधीच जमत नाही. मी या गोष्टी लिहित असतानाच माझ्या मित्रानं सांगितलं, “तुम्ही स्वार्थी असल्याशिवाय तुमच्याकडे सातत्य येत नाही.” तरीही आपण स्वार्थी नाही म्हणून सुखावून जाण्याचं धाडस मनाला होत नाही. त्यामुळंच नवं वर्ष अवघं तासाभराच्या अंतरावर असताना आपण हा प्रपंच सुरु करावा की नाही? याचा अनेकदा मनात विचार येऊन गेला. पण प्रयोग करायला काय हरकत आहे? हा पूर्णत: माझा विचार मनात आला. कारण प्रयोग कधीच अपयशी होत नाहीत. ती बराचकाळ चालणारी प्रक्रिया असते. ती जर बंद पडली तर प्रयोग पूर्णत्वाला गेला नाही. असं गोंडस नाव आणि कारणही देता येईल. अनेकदा घटनांवर, माणसांवर, स्वत:वर लिहिण्याचा मोह होतो. पण त्यानं काय फरक पडतो? असं दुसऱ्या क्षणाला नाही, पण काहीवेळानं तरी वाटतं. मग पुन्हा उतरत्या क्रमानं स्वत:चा प्रवास सुरु होतो. पण बॅक ऑफ माइंड जे सुरु असतं. ते फार भारी असतं. ते जसच्या तसं कागदावर उतरावयाला लोकं तप करतात. काहींना ती देवदत्त देणगी म्हणून मिळालेली असते. आपण जिनियस प्रकारात नक्कीच मोडत नाही. त्यामुळं मनासारखं होईतो बरंच घासावं लागतं, हा माझा स्वत:चा अनुभव आहे. त्यात जरा जास्त मजा आहे. कारण सहज जमलेल्या गोष्टीनंतर माणसाचं मन रितं, रिकामं राहतं. पण त्यातल्या त्यात थोडी लागल्यानंतर हवं तसं जमलं तर ती अख्खी प्रक्रिया संमोहनासारखी वाटते.. पहिल्या दिवशी एवढं पुरेसं आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s